हळव्या तोडीचे सुर दूर कुठे तरी आसमंती अस्पष्टसे
हळव्या मनाला हळूवार विंझणवारा घालाणारे ,
हळुवार आठवणींचे हळवे धागे रेशमी मुलायम
हळवारंग संध्याछायेचा हळव्या आठवणी कडा ओलावाणाऱ्या
हळव्या मनाचा हळुवार गोफ हलकेच विलगणारा,
दूर कुठेतरी सावरीच्या कापसासारखी
हवेत विरणारी माझी आर्त विराणी .
डॉ . दत्ता फाटक 4 -- 2 -- 99
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आधार वड -----------
मी माझा असतोच कधी असतो तो धुक्यात वाट हरवलेला,
अवेळी पाडणाऱ्या वळवा सारखा हळवा
शिशिरी काल्या सारखा थंड हाडं गोठविणारा .
भन्नाट उजाड माळावरल्या आधारवडा सारखा अधांतरी .
सुकाणू नसल्या नावेसारखा गात्रहीन वल्ह्या सारखा ,
उतारावरील चक्रे बेभान अनंतात कुठेतरी अंत
शोधणारी वेडीबागडी ------------------
डॉ . दत्ता फाटक ---- 4 -- 2 --99.

मी जगत होतो असा कीं जगलोच नाही ------------
मी जगता जगता जगत होतो असा की मी खरा जगलोच नाही
हसता हसता हसत होतो असा की रडलो केंव्हा कळलेच नाही
मी रडता खुरडता लोक हसत होते हसण्यातला भाव उमगलाच नाही
मी हसलो !! ते विस्मयाने पहात होते पाहताना तें निर्विकारच होते
मी मात्र माझ्या मस्तीतच एखाद्या कलंदरासारखा मस्त होतो
हसण रडण याची सीमारेषा एवढी अंधुक की
मी रडताना हसत होतो हसताना रडत होतो
काहीच कळत नव्हते तरी मी माझ्या मस्तीत मस्त होतो
डॉ. दत्ता फाटक
------------------------------------------------------------------------------------------------------------
घर कसं बाळमुठीत कोंदणात सजणार -----------------
घर शेणाच, घर मेणाच, माती दगड वीटानचे
घर कसं ही पण घर हवं -------------------
माउलीच्या साउलीच, अश्रुभरल्या ओलाव्याच,
घर हसतं, घर रांगत , घर बाळमुठीत कोंदणात सजतं ,
घर कसही पण घर हवं ----------------------
लडिवाळ , घर हवं गाउलीच्या सायी सारखं ,
घर मधु मक्षिकेच, मधभरल्या ओलाव्याच,
मधभरल्या माधुर्याच----------------------------
घर कसं सजतं ----------------------------
घर कणाकणानी सजलेलं , घामाच्या रेघांच
घर घराचे घरपण टिकविणारे , ----------
सांजवाऱ्यासवे घराकडे ओढावणार ------
घर कसं असंच ---------------------
बोलक , हसरं , सांजवेळी माणसां घराकडे
खेचंणारं, घरटी पांखरू झेपावतं तसं,
घराच घरपण सांजवाती सारं मंद तेवणार ,
मनोमनी घर असच हवं नाई का !!!
डॉ . दत्ता फाटक .
---------------------------------------------------------------------------------------------------------
मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे
माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 -----
आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले ,
माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले ,
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 --------
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे
माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 --------
काही करू पहाता विपरीत होत आहे ,
माझे मला न उमगे का हे असेच होते
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------- 4 --------
माझ्या मनात आता सल एक वाहताहे ,
प्राषुन दु:ख सारे अंमृत वर्षताहे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------5 --------
माझाच पोसलेला मी एक मात्र आहे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ---- 1 ------
डॉ . दत्ता फाटक .
----------------------------------------------------------------------------------------------------------------
एकाकी जगण तरीही ------------ साथसंगती -------
जगणं जरी माझं एकाकी तरी मनमंतरी माझ्या
अनेक साथी सांगाती माझ्याचं प्रतिबिंबात
माझं जगणं एकाकी तरी मी एकटा नव्हतोच कधी
मित्र होते किंबहुना नव्हतेही सगेसोयरे भरभरुन होते
ते जीवा भावा चे इष्ट आप्त माझ्याच मनी दडलेले
बाहेरच्या जगती मात्र ते इष्टाचे अनिष्टच वाटत होते
मी एकटा अगदी एकटाच एकलांडा शिपाई एकलेपणी
एकाकी पणा शी स्वत्वान हासत खेळत झुंजत होतो
होणारे घाव सुखद होते मन्वंतरीचे सोबती सांगाती
एकटेपणाच्या साथीला अनेक कलांच ललित होतं
डॉ . दत्ता फाटक .
---------------------------------------------------------------------------------
सुखद आठवणीचा शोध आता ----------------------------
काहीं आता सांगायचे नाही काहीं आता बोलायचं नाही
मातेरल्या आयुष्याच वस्त्र वेशीवर टांगायचं नाही ,
विटल्या विरल्या वस्त्राचा पोत आता पहायचा नाही,
काही आता सांगायचं नाही काही आता बोलायचं नाही। --- 1 ---
पायदळी तुडविल्या फुला वास आता येणें नाही .
विसकटल्या घरट्याचा कुबट वास आता जाणे नाही ,
काहीं आता सांगायचे नाही काहीं आता बोलायचे नाही. ---2 ---
प्राप्त भोगणे, भोगणे आता टाळू पाहता टळणार नाही,
तुटल्या साथ संगतीचा खेद आता करणे नाही.
काही आता सांगायचं नाही काही आता बोलायचं नाही . --- 3 ---
आयुष्याच्या निर्माल्यातून शोध सुखद आठवांचा
टाळू पाहता टळणारं नाही खरं सांगू
पण त्यात काही अर्थ नाही म्हणून त्यात गम्य नाही.
काही आता बोलायचं नाही बोलून काही उपयोग नाही. --- 4 ---
डॉ. दत्ता फाटक .
-----------------------------------------------------------------------------------------------------------
पंख फुटलेली पिल्लं
जाणती नेणती पिल्लं इवल्याशा पंखानी
निळ्याभोर आसमंती गगन भरारी घेत ,
खूप खूप दूर गेली शरीरानं अन मनानं , --- 1 ---
त्यांचे ताल निराळे , कायदे निराळे
त्यांच्या द्रुत तालात मी बसत नव्हतो
त्यांच्या मात्रा निराळ्या त्यांचा समेत मी बसत नव्हतो --- 2 ---
त्यांची भरारी मोठ्ठी त्यांचं विस्तारलेलं आसंमंत --- 3 ---
माझ्या पंखात जटायूबळ माझ्याच सिमितजगी उडण्याचं अपेक्षा माझ्या उत्तुंग भरारीची जाण मला तुटपुंज्या बळाची --- 4 ---
तेवढंच त्याना कळत नव्हतं !! अलास !! पंख फुटलेली पिल्लं ,
खुप खूप दूर गेलेली शरीरानं अन मनानं

जीवनाचं गूढ गणित !! ताळ अन मेळ ??
ठोकताळा जमला , तरी ताळा नाही जमला,
उत्तर बरोबर आलं तरी रीतीत फसलं
गणित जीवनाचं कुठेतरी चुकलंच. ---- 1 ---- .
निर्व्याज हसणं बाळ मुठीत लपलं
माझं मी कळलं तें बेरजेत फसलं
जीवनाचं गणित कुठेतरी चुकलंच ---- 2 ----
निरागस देखण पापणीत लपलं
सारं हसणं वजाबाकीत संपलं
जीवनाचं गणित कुठेतरी चुकलंच ---- 3 ----
भाग, भाज्य, भागाकार आई, बाबा, अन मी
एव्हढाच जीवनाचा आकार, उकार
उरलं सुरलं कांही तेवढंच फक्त बाकी उरतं ---- 4 ----
एकक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार , भागाकार ,
पूर्णांक , अपूर्णांक, छेद , विच्छेद,
खरंच का जीवन एक धगधगता संग्राम ---- 5 ----
धोक्याचं वरीस सोळावं आलं ,
निसरड्या वाटेवरलं संभाळणं आलं
जीवनाचं गणित आता कुठं सुरू झालं ---- 6 ----
गद्धे पंचविशीतील उफाळणं संपलं,
चाळीशीचं झापण डोळ्यावर आलं ,
जीवनाचं गणित थोडंस घसरलं ---- 7 ----
पंन्नाशीत जरासं कुठं एकक जमलं
कशारिती सोडवलं तरी उत्तर एकच आलं
जीवनाचं गणित थोडसं ताळ्यात आलं ---- 8 ----
आता कुठं एककाने माझे मीपण हरपलं
एक अंके दुज्या गुंणता अंक मात्र तोच आला
जीवना चं गणित आता पूर्ण ताळ्यात आलं ---- 9 ----
एककाचा मी आता पूर्णात गुंतला
जीवशिवाला एकमेकी गवसला
जीव शिवाशी एकरूप झाला जीवनाचा ताळमेळ पुरेपूर जमला ---- 10 ----